Join WhatsApp Group

Join Telegram Group

नाशिक पोलीस भरतीचा निकाल जाहीर ! पहा पात्र उमेदवारांची यादी

नाशिक पोलीस शिपाई भरती 2022 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे , खाली त्याबद्दल संपूर्ण पात्र उमेदवारांची यादी खाली दिली आहे 

नशिक पोलिस अधिकृत वेबसाइट

http://www.nashikruralpolice.gov.in ही नाशिक पोलिस ग्रामीण पोलिस अधिकृत website आहे 

लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी सूचना

  • पोलीस भरती २०२१ अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी दिनांक ०४ ते २० जानेवारी, २०२३ रोजी मैदानी चाचण्या आयोजीत करण्यात आल्या होत्या. सदर दिवशी घेण्यात आलेल्या मैदानी चाचण्यांचे निकाल त्या-त्या दिवशी नाशिक ग्रामीण पोलीस घटकाच्या (www.nashikruralpolice.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते.
  • मैदानी चाचण्यांचे दररोजचे निकाल प्रसिध्द केल्यानंतर उमेदवारांचे सामाजिक, समांतर आरक्षण व त्यांना मिळालेल्या गुणांची अचूक नोंदणी झाल्याची पडताळणी करण्याबाबत उमेदवारांना सुचित करण्यात आले होते. या संदर्भात उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपाबाबत आवश्यक पडताळणी करुन अभिलेखात दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. सदर दुरस्त्यांबाबतचे निर्णयदेखील आम्ही दिनांक ३०/०१/२०२३ व दिनांक १०/०२/२०२३ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहेत.
  • मैदानी चाचण्यांत ज्या उमेदवारांना किमान ५० टक्के गुण मिळतात अशा उमेदवारांमधून १:१० या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी उमेदवार पात्र ठरतात. मैदानी चाचणीत किमान ५० टक्के म्हणजेच किमान २५ गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधूनच लेखी परिक्षेसाठी उमेदवार पात्र ठरविण्यात येतात.
  • नाशिक ग्रामीण घटकात पोलीस शिपाई पदासाठी एकुण ११,२४४ उमेदवारांनी मैदानी चाचण्या दिल्या होत्या. त्यातील (४५१८) उमेदवारांना २५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. सदर उमेदवारांमधुन १:१० या प्रमाणात (१८६१) एवढे उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. सदर उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी सोबत जोडली आहे.
  • लेखी परिक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आपले नांव, चेस्ट क्रमांक व इतर अनुषंगिक माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. यासंदर्भाने आपणास काही अडचण असल्यास नाशिक ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाकडील (०२५३-२२००४०१, २२००४९५ २२००४९९ ) या क्रमांकावर संपर्क साधावा.
  • पोलीस भरतीसाठीची लेखी परिक्षा राज्यात सर्वत्र एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याने उमेदवारांना लेखी परिक्षेसाठीचा दिनांक, वेळ व ठिकाण यथावकाश कळविण्यात येईल.

काही शंका असतील तर संपर्क

  • लेखी परिक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आपले नांव, चेस्ट क्रमांक व इतर अनुषंगिक माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. यासंदर्भाने आपणास काही अडचण असल्यास नाशिक ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाकडील (०२५३-२२००४०१, २२००४९५ २२००४९९ ) या क्रमांकावर संपर्क

पात्र उमेदवारांची अधिकृत यादी


Download Result

Facebook
WhatsApp

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">