नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेले आहे जाहिरातीचा क्रमांक 01/ 2023 असा आहे सदर जाहिरातीमध्ये 10 फेब्रुवारी 2023 रोजी काही बदल करण्यात आलेले आहेत ते बदल समजून घेणे खूप महत्त्वाचे खाली त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे नक्की वाचून घ्या
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 याबाबत सरकारने शुद्धिपत्रक जाहीर केले त्या शुद्धिपत्रकानुसार मागच्या जाहिरातीमध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या त्या सर्व चुका आयोगाने या शुद्धिपत्रकात बदल केलेले आहेत
आयोगाने काढलेल्या शुद्धिपत्रकात नेमके काय – काय बदल केले ते खाली दिल आहे वाचून घ्या
- मागे आलेला जाहिरातीमध्ये आयोगाने वयोमर्यादा मध्ये दिलेली सूट नमूद करण्यात आलेली नव्हती आता आयोगाने त्याबाबतची एक वेगळी जाहिरात काढून त्याबाबतची शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये असलेली तफावत आयोगाने आता दूर केली आहे खाली आपण नोटिफिकेशन दिले आहेत ते संपूर्ण वाचून घ्या आपणास ते सर्व समजून जाईल
- आयोगाने मागच्या शुद्धीपत्रकामध्ये कक्षाधिकारी (ASO) या पदासाठी टंकलेखन ही कौशल्य चाचणी अनिवार्य केली होती मात्र त्याऐवजी आता आयोगाने कक्षाधिकारी या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी नसणार आहे असे जाहीर केले आहे
- आयोगाने चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत 19 फेब्रुवारी ऐवजी आता 20 फेब्रुवारी 2023 अशी केलेली आहे
असे मुख्य तीन बदल आयोगाने आपल्या शुद्धीपत्रकामध्ये दिलेले आहेत